Ad will apear here
Next
कर्दळीवन : एक अनुभूती
‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रगटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी येथे भेट दिली. तेथील परिसर, तेथील सर्व माहिती त्यांनी घेतली. तेथील अनुभव त्यांनी ‘कर्दळीवन : एक अनुभूती’मधून सांगितले आहेत.

या स्थानाचे महात्म्य, दत्तात्रेयांचे तीन अवतार कर्दळीवनाचा इतिहास, तेथील जैवविविधता, परिक्रमेचा इतिहास, ती कशी करावी, कर्दळीवनाविषयी समज, अपसमज आणि श्रद्धा, अतिथी सेवा, अन्नदान, कलियुगातील दत्त अवतारांचे कार्य आणि दत्त उपासना याविषयी सर्व माहिती यात आहे. 

परिशिष्टात दत्तप्रभूंचा दिनक्रम, देशातील आणि नर्मदा परिक्रमेतील प्रमुख दत्तक्षेत्रे, दत्तात्रेयांचे १६ अवतार, दुर्मिळ दत्त मंत्र, यंत्र व स्तोत्रे दिली आहेत. आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक दत्तभक्तांबरोबरच अन्य वाचकांची जिज्ञासा पूर्ण करते.

पुस्तक : कर्दळीवन : एक अनुभूती
लेखक : प्रा. क्षितीज पाटुकले
प्रकाशक : कर्दळीवन सेवा संघ
पाने : १७६ 
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZPOCC
Similar Posts
कर्दळीवन- एक अनुभूती दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान असलेल्या कर्दळीवनासंबंधी विस्तृत माहिती देणारे प्रा. क्षितीज पाटुकले यांनी या पुस्तकात दिली आहे.
श्रीदत्त परिक्रमा ‘श्रीदत्त परिक्रमा’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
अद्भुत स्वर्गारोहिणीच्या सफरीचा माहितीपट पुणे : हिमालयाच्या कुशीत अत्यंत रमणीय, निसर्गरम्य प्रदेशात पौराणिक वारसा असलेली अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत. असेच एक ठिकाण आहे स्वर्गारोहिणी. येथूनच पांडव स्वर्गात गेले असे म्हणतात. हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील बद्रिनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातील कर्दळीवन सेवा संघाने
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language